गुंतवणूक म्हणून सोन का उत्तम आहे? जाणून घ्या सोनं खरेदीचे 9 जबरदस्त फायदे जे प्रत्येक गुंतवणूकदाराने समजून घेतले पाहिजेत!
परिचय : गुंतवणूक म्हणून सोन का निवडावे?
गुंतवणूक म्हणून सोन का निवडावे? खरंतर सोनं (GOLD) हे केवळ एक आभूषण नाही, तर एक विश्वसनीय आणि महत्त्वाचा गुंतवणूक पर्याय असून, तो सर्वांसाठी सोपा देखील आहे. हजारो वर्षापासून आपल्याला माहित आहे की सोनं हे एक मानव जातीचे धन आणि सर्वांच्या आर्थिक सुरक्षेसाठी प्रतीक म्हणून सोन्याकडे बघितले जाते.
खरंतर आजही सोनं काही ठिकाणी पैसे म्हणून वापरले जात आहे आणि अशा अजून बऱ्याच देशांमध्ये ते सर्व मान्य साधन म्हणून सुद्धा आहे. आणि आपल्या भारत देशामध्ये देखील सोन्याला एक सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे.
पण तुम्हाला असं वाटतं का की सोनं गुंतवणुकीसाठी योग्य आहे ? किंवा गुंतवणूक म्हणून सोनं का निवडावं ? खरंच ते आपल्यासाठी चांगलं आहे का सुरक्षित आहे का ? त्याचे काय फायदे आहेत? तुमच्या मते, आर्थिक अस्थिरतेच्या काळात कोणती साधने तुम्हाला सुरक्षित वाटतात? चला तर मग सोन्याच्या या नऊ महत्त्वाच्या फायद्यांविषयी आपण आज चर्चा करूया आणि या नऊ फायद्यांचा तुमच्या आर्थिक योजनांशी कसा संबंध आहे ते देखील आपण आज बघूया.
१. ऐतिहासिक स्थिरता (Historical Stability)
सोनं हजारो वर्षापासून एक किंमत साठवून ठेवणारे म्हणजेच मूल्य साठवणूक म्हणून वापरले जात आहे. हे वेगवेगळ्या आर्थिक परिस्थिती मधून येऊन सुद्धा त्याचे मूल्य कायम राहिलेले आहे. उदाहरणार्थ 2008 ते 2012 मध्ये जेव्हा जगावर आर्थिक संकट आलं होतं तेव्हा सोन्याची किंमत 100% पेक्षा जास्त वाढलेली होती. त्यामुळे जर एखाद्याने त्यावेळी गुंतवणूक म्हणून सोन म्हणजेच सोन्यामध्ये गुंतवणूक केली असती, तर आज त्याची व्हॅल्यू कितीतरी पटीने वाढलेली असती. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीसाठी खूप खूप दीर्घ काळासाठी स्थिरता किती महत्त्वाची आहे. त्यामुळे हा पण हा देखील विचार करणे गरजेचे आहे की सोन्याची ही स्थिरता आपल्या आर्थिक उद्दिष्टांना कशी पूरक ठरू शकते.
२. विविधीकरण (Diversification)
विविधीकरण म्हणजेच सर्व व अंडी एकाच टोपलीत न ठेवणे’ ही एक जुनी म्हण आहे, याचा अर्थ असा की, गुंतवणूक म्हणून सोन याचा विचार करताना तुमची सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नका. सोनं ही एक वेगळी प्रकारची गुंतवणूक आहे की जी शेअर मार्केट किंवा बॉण्ड सारखी नाही. म्हणून इतर गुंतवणूक जरी कमी झाली तरी सोनं त्यावेळेस स्थिर राहू शकत किंवा किंमत वाढवू शकत. म्हणून विविधीकरण हा एक सोन्याचा चांगला फायदा आहे.
३. इन्फ्लेशनविरुद्ध बचाव (Hedge against inflation)
महागाई मध्ये जेव्हा वस्तूच्या किमती वाढतात आणि पैशाचा मूल्य कमी होतं त्यावेळी तुम्ही तुमच्या संपत्तीचं रक्षण कसं करता? सोने हे महागाई विरुद्ध एक प्रभावी बचाव साधन आहे. जेव्हा पैशाचे मूल्य कमी होतं तेव्हा सोन्याची किंमत सहसा वाढते. म्हणजेच गेल्या काही दहा वर्षांमध्ये सोन्यापासून मिळणारा परतावा हा महागाईच्या दरापेक्षा जास्त होता म्हणजेच सोने हे आपल्याला महागाई विरुद्ध बचाव म्हणून काम करते.
४. सांस्कृतिक महत्त्व (Cultural Significance)
सोन्याचा चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे सोन्याला आपल्या भारतामध्ये एक सांस्कृतिक महत्त्व खूप आहे. कारण भारतामधील प्रत्येक सणांच्या वेळी किंवा एखादा कार्यक्रम जर असेल तर अशावेळी गुंतवणूक म्हणून सोन म्हणजेच सोन्याची खरेदी ही हमखास केली जाते. कारण भारतामध्ये सोन्याला धन किंवा समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. दिवाळीच्या काळामध्ये तर सोन्याची खरेदी ही सर्वात जास्त होते. त्यामुळे या सांस्कृतिक गोष्टी सोन्याच्या किमतीला स्थिरता देण्याचे काम करते.
५. जागतिक स्वीकृती (Global Acceptance)
सोन्याचा पाचवा महत्त्वाचा फायदा म्हणजे सोन्याला जागतिक स्वीकृती आहे. तुम्ही जगात कुठेही असाल त्या ठिकाणी तुम्हाला सोनं सहज विकता येत आणि खरेदी देखील करता येत त्यामुळे सोनं एक लिक्विडिटी चे साधन म्हणून सहज उपलब्ध होते.
६. कर लाभ (Tax Benefits)
जास्त उत्पन्न असणाऱ्या वर्गासाठी सोना हे एक कर लाभ म्हणून देखील काम करते. कारण भारतामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर अनेक वेगवेगळ्या कर सवलती देखील व्यक्तीला प्राप्त होतात. जसे की,
- सार्वभौम सोन्याच्या बॉन्डवर (SGB) मिळणारा नफा हा करमुक्त आहे.
- गोल्ड मोनेटायझेशन स्कीम यावरील व्याज देखील करमुक्त आहे.
- कोतवाल कोतवाल दीर्घकालीन भांडवली नफ्यावर देखील तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठेवलेल्या सोन्यावर इंडेक्सेशन लाभ मिळतो
७. आर्थिक संकटात रक्षक (Protector in Economic Crisis)
जेव्हा वित्तीय बाजारपेठेमध्ये अस्थिरता असते तेव्हा सोन्याला एक सुरक्षित साधन म्हणून ओळखले जातात कारण वित्तीय म्हणजेच आर्थिक किंवा भूराजकीय संकटात त्याची किंमत सहसा वाढते उदाहरणार्थ 2013 ते 2014 मध्ये जेव्हा भारताच्या चलनावर दबाव होता तेव्हा सोन्याच्या किमतीने गुंतवणूकदारांना आधार दिला होता अशा काळात सोन्यासारखी साधन संपत्ती तुमच्या पोर्टफोलिओ ला स्थिरता देऊ शकते त्यामुळे सोन्याचा हा सातवा महत्त्वाचा फायदा आहे की सोने हे आपल्याला आर्थिक संकटात रक्षक म्हणून काम करते.
८. सोन्याच्या गुंतवणुकीला दिवाळखोरी होण्याची शक्यता नाही
सोना एक भौतिक साधन आहे. कारण सोनं हे कोणत्याही कंपनी किंवा संस्थेवर अवलंबून नाही. त्यामुळे सोन्याची किंमत कोणत्याही दिवाळीखोरीवर किंवा आर्थिक अडचणीमुळे प्रभावित होत नाही. शेअर मार्केटमध्ये म्हणजेच बॉन्समध्ये स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यावर त्या संबंधित कंपन्यांच्या आर्थिक अडचणीनुसार त्यांच्या मूल्यांमध्ये घट होऊ शकते. पण सोन्याच्या बाबतीमध्ये अशी शक्यता नाही. त्यामुळे सोन्याचा हा आठवा महत्त्वाचा फायदा म्हणजे सोन्याच्या गुंतवणुकीला दिवाळखोरी होण्याची शक्यता नाही.
९. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी विशेष ज्ञानाची आवश्यकता नाही
शेवटचा आणि महत्त्वाचा नवा फायदा म्हणजे, सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला विशेष ज्ञानाची गरज भासत नाही. म्हणजेच गुंतवणूक म्हणून सोन हे भारतातील नव्हे तर जगातील सर्वच व्यक्ती गुंतवणूक म्हणून सोन हे करत असतात. विशेष म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी विशेष ज्ञान आणि ट्रेनिंग ची गरज असते पण खरंतर सोन्यामध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल म्हणजेच सोनं खरेदी करायचा असेल तर ते करणं हे खूप सोपं आहे. यासाठी तुम्हाला चार्ट बघण्याची गरज नाही ट्रेडिंग बोर्डवर विश्वास ठेवण्याची गरज नाही फक्त सोन्याचा दर दररोज बघून सोन्याची इन्व्हेस्टमेंट करणे अपेक्षित आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सोनं करणं हे कुणालाही सोपं आहे.
सारांशिक तक्ता
फायदा | वर्णन | उदाहरण/पुरावा |
---|---|---|
इतिहासात्मक स्थिरता | सोनं हजारो वर्षांपासून मूल्य साठवणूक आहे आणि आर्थिक मंदीला तोंड देतं. | 2008-2012 मध्ये सोन्याची किंमत 100% पेक्षा जास्त वाढली (Forbes). |
विविधीकरण | सोनं पोर्टफोलिओमधील धोका कमी करतं कारण त्याची किंमत इतर परिसंपत्तींशी संबंधित नसते. | सोन्याचा शेअर बाजाराशी कमी संबंध. |
इन्फ्लेशनविरुद्ध बचाव | सोनं चलनाचं मूल्य कमी झाल्यावरही आपलं मूल्य टिकवून ठेवतं. | गेल्या दशकात सोन्याचा परतावा इन्फ्लेशनपेक्षा जास्त . |
सांस्कृतिक महत्त्व | भारतात सोनं धन आणि समृद्धीचं प्रतीक आहे, विशेषत: सणांमध्ये. | दिवाळीत सोन्याची मागणी वाढते. |
जागतिक स्वीकृती | सोनं जगभरात सहज विकता आणि खरेदी करता येतं. | उच्च द्रवता . |
कर लाभ | भारतात सोन्याच्या गुंतवणुकीवर कर सवलती उपलब्ध आहेत. | SGB वर करमुक्ती (Bank of Baroda). |
आर्थिक संकटात रक्षक | आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोनं सुरक्षित आश्रय आहे. | 2013-2014 मध्ये भारतीय चलनावर दबाव असताना सोन्याने आधार दिला . |
सोन्याच्या गुंतवणुकीला दिवाळखोरी होण्याची शक्यता नाही | सोनं हे एक भौतिक परिसंपत्ती आहे जी कुठल्याही कंपनी किंवा संस्थेवर अवलंबून नाही. | Birch Gold |
सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी विशेष ज्ञानाची आवश्यकता नाही | सोन्यात गुंतवणूक करणं हे फारसं जटिल नाही. तुम्हाला विशेष ज्ञान किंवा प्रशिक्षण आवश्यक नाही. | Groww |
सोन्यात कसे गुंतवणूक करावी?
गुंतवणूक म्हणून सोन असा विचार करत असाल तर भारतात सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही कोणता मार्ग निवडाल? खालील पर्यायांचा विचार करा:
- भौतिक सोनं: आभूषण, सिक्के किंवा बार्स. याला सुरक्षित साठवणुकीची गरज आहे.
- सोन्याचे ईटीएफ: स्टॉक एक्स्चेंजवर व्यापार केले जाणारे फंड, जे सोन्याच्या किंमतींशी जोडलेले असतात.
- सार्वभौम सोन्याची बांडे (SGB): सरकारद्वारे जारी, 2.5% व्याज आणि कर सवलतींसह.
- सोन्याचे म्युच्युअल फंड: सोन्यावर आधारित फंड, जे भौतिक सोन्याशिवाय गुंतवणूक देतात.
- डिजिटल सोनं: ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सोनं खरेदी करण्याचा सोपा मार्ग.
प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि धोका-सहनशीलतेअनुसार तुम्ही कोणता पर्याय निवडाल?
निष्कर्ष
गुंतवणूक म्हणून सोन (Gold As An Investment) हा एक प्राचीन आणि विश्वसनीय मार्ग आहे जो आजही गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे. त्याची ऐतिहासिक स्थिरता, सांस्कृतिक महत्त्व, आणि कर सवलती यामुळे भारतातील गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक म्हणून सोन म्हणजे एक विशेष आकर्षक आहे. शिवाय, सोन्याच्या गुंतवणुकीला दिवाळखोरी होण्याची शक्यता नाही आणि त्यात गुंतवणूक करण्यासाठी विशेष ज्ञानाची देखील आवश्यकता नाही. या फायद्यांमुळे सोनं एक अधिक आकर्षक गुंतवणूक पर्याय बनतं. पण तुम्ही सोन्यात गुंतवणूक का कराल? तुमच्या आर्थिक योजनांमध्ये सोन्याचा समावेश कसा कराल? या प्रश्नांचा विचार करा आणि तुमच्या गुंतवणूक धोरणात सोन्याला स्थान द्या.
गुंतवणूक म्हणून सोन यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. तोला म्हणजे किती ग्रॅम?
उत्तर:
१ तोला म्हणजे सुमारे ११.६६४ ग्रॅम. भारतात पारंपरिक वजन मोजण्याची ही एक एकक प्रणाली आहे जी आजही सोनं विक्रीत वापरली जाते.
2. २४ कॅरेट सोने कसे ओळखायचे?
उत्तर:
२४ कॅरेट म्हणजे १००% शुद्ध सोने. त्याला चकाकी जास्त असते पण ते नरम असते. BIS हॉलमार्कवर 999 असे अंक असतील तर ते २४ कॅरेट शुद्धतेचं चिन्ह आहे.
3. कॅरेट म्हणजे काय?
उत्तर:
कॅरेट म्हणजे सोन्याची शुद्धता मोजण्याचं प्रमाण.
२४ कॅरेट = 100% शुद्ध
२२ कॅरेट = सुमारे 91.6% शुद्ध
१८ कॅरेट = सुमारे 75% शुद्ध
उर्वरित टक्केवारी धातूंचं मिश्रण असतं.
4. शुद्ध सोने कसे ओळखावे?
उत्तर:
शुद्ध सोनं ओळखण्यासाठी खालील गोष्टी तपासा:
BIS हॉलमार्क
कॅरेट प्रमाण (22K/24K)
999 किंवा 916 अंक
विक्रेत्याचा नोंदणीकृत कोड आणि वर्ष
5. २२ कॅरेट सोने म्हणजे किती टक्के सोने?
उत्तर:
२२ कॅरेट सोनं म्हणजे सुमारे ९१.६% शुद्ध सोने, आणि उर्वरित ८.४% इतर धातूंचं मिश्रण असतं जे दागिन्यांना मजबुती देतात.
6. ‘सोने’ या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत?
उत्तर:
‘सोने’ या शब्दाचे काही समानार्थी शब्द म्हणजे:
सुवर्ण
हेम
कांचन
कांचनमृग (काव्यात्मक)
श्री