डिजिटल पेमेंट म्हणजे काय ? याचं उत्तर जाणून घेताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट विचारात घेणे अपेक्षित आहे की ही एक अशी प्रणाली आहे की ज्यामध्ये पैशाची देवाणघेवाण ही चेक किंवा रोख स्वरूपामध्ये होत नाही.
डिजिटल पेमेंट (Digital Payment) प्रणालीने आर्थिक व्यवहारांमध्ये क्रांती घडवून आणली आहे, ज्यामुळे व्यवहार जलद, सोपे आणि अधिक कार्यक्षम झाले आहेत. रोख रक्कम किंवा चेकऐवजी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून पैसे हस्तांतरित करण्याची ही एक आधुनिक पद्धत आहे. आजच्या वेगवान जगात, डिजिटल पेमेंट (Digital Payment) केवळ सुविधाच देत नाहीत, तर आर्थिक समावेशन आणि पारदर्शकतेलाही चालना देतात, ज्यामुळे सरकारे, कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी व्यवहार अधिक स्वस्त आणि सुरक्षित होतात.
डिजिटल पेमेंट म्हणजे काय?
डिजिटल पेमेंट (Digital Payment) प्रणाली म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक माध्यम जे तुम्हाला रोख रक्कम किंवा चेकऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे भरण्याची सुविधा देते. यामध्ये डेबिट/क्रेडिट कार्ड, मोबाइल वॉलेट, UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आणि BHIM (भारत इंटरफेस फॉर मनी) यांसारख्या विविध पद्धतींचा समावेश होतो.
डिजिटल पेमेंट (Digital Payment) म्हणजे की आपण आपले पैसे ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवत असतो. म्हणजेच पैसे ऑनलाईन पद्धतीने किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यासाठी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड मोबाईल वॉलेट यूपीआय आणि भीम यांसारख्या विविध पद्धतींचा समावेश याच्यामध्ये होत असतो यांच्यामार्फतच डिजिटल पेमेंट हे केले जाते.
आजच्या या लेखामध्ये आपण डिजिटल पेमेंट (Digital Payment) चा वापर करत असताना आपल्यासाठी 10 महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स काय आहेत हे आपण या लेखामध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूया 10 शक्तिशाली सुरक्षा टिप्स ज्या आपल्याला डिजिटल पेमेंट (Digital Payment) करत असताना महत्त्वाच्या आहेत.

1. मजबूत आणि एक वेगळा असा युनिक पासवर्ड वापरा (Use a strong and unique password)

म्हणजेच आपल्याला डिजिटल पेमेंट (Digital Payment) चा वापर करत असताना पैसे पाठवण्यासाठी आपल्याला एका पेमेंट ॲप्स द्वारे (Payment Apps) किंवा इंटरनेट बँकिंग (Internet Banking) द्वारे पैसे पाठवावे लागतात. यासाठी आपल्याला या वेगवेगळ्या ठिकाणी आपले खाते ओपन करावे लागते. अशा वेगवेगळ्या ऑनलाईन सेवांसाठी आपण नेहमीच एक मजबूत आणि युनिक असा वेगळा Password निवडावा.
मजबूत पासवर्ड म्हणजेच की या पासवर्ड मध्ये कमीत कमी आठ ते बारा अक्षरे असावेत आणि यामध्ये एक अक्षर हे मोठ आणि लहान अक्षरे, संख्या आणि वेगवेगळी विशेष चिन्ह उदाहरणार्थ (!,*,@,#,&) यांचा वापर करावा. वेगवेगळ्या Apps साठी वेगवेगळा पासवर्ड वापरा म्हणजेच एक खाते जर Hack झाले तर इतर खाती आपली सुरक्षित राहतील.
थोडक्यात पासवर्ड म्हणजे हा तुमच्या डिजिटल तिजोरीची एक चावी आहे. सायबर अटॅक पासून वाचायचे असेल तर आपल्याला डिजिटल पेमेंट (Digital Payment) वापरत असताना ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मजबूत आणि एक वेगळा Unique असा Password वापरणे ही आपल्या ऑनलाईन सुरक्षितेसाठी पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे.
2. टू फॅक्टर ऑथेंटीकेशन चालू करा. (Enable two-factor authentication)

दुसरी महत्त्वाची सुरक्षिततेसाठी टिप्स म्हणजे आपण आपल्या ऑनलाइन खात्यासाठी टू फॅक्टर ॲथॉन्टीकेशन (Two Factor Authentication) चालू करून ठेवावे. यामध्ये आपल्या पासवर्ड बरोबरच आपल्याला आपल्या मोबाईल नंबर वर OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड किंवा बायोमेट्रिक म्हणजेच फिंगरप्रिंट किंवा चेहऱ्याची ओळख वापरून ती ओळख पडताळावी लागते.
त्यामुळे एखाद्या हॅकर्सला तुमच्या खात्यामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी ही महत्त्वाची पायरी आहे. कारण त्यांना जरी तुमचा पासवर्ड मिळाला तरी या टू फॅक्टर ऑथेंटीकेशन मुळे त्यांना तुमच्या खात्यामध्ये प्रवेश करता येणार नाही. तुमच्या खात्याला एक मजबूत सुरक्षा कवच मिळते जे सायबर हल्ल्यापासून आपल्याला लांब ठेवते. त्यामुळे डिजिटल पेमेंट वापरणाऱ्या व्यक्तींनी टू फॅक्टर ॲथॉन्टीकेशन (Two Factor Authentication) हे चालू करून ठेवावे.
3. सार्वजनिक वाय-फाय चा वापर शक्यतो टाळावा. (Avoid using public Wi-Fi if possible)

सार्वजनिक Wi-fi म्हणजे आपण एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेल्यावरती मोफत वायफाय नेटवर्क आपल्याला मिळतात. म्हणजे कॅफे हॉटेल विमानतळ रेल्वे स्टेशन इतर ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला मोफत वाय-फाय नेटवर्क मिळते. पण जर आपण अशा ठिकाणी आर्थिक व्यवहार करत असू तर तो आर्थिक व्यवहार हा त्या मोफत वायफायच्या नेटवर्क करू नये.
कारण मोफत वायफाय नेटवर्क हे असुरक्षित असते. त्यामुळे त्या मार्फत जर आपण आपल्या आर्थिक व्यवहार केले तर आपले ऑनलाईन खाते म्हणजे डिजिटल पेमेंटचे अकाउंट हे हॅक होऊ शकते. कारण या द्वारे हॅकर्सला तुमचा सगळा डेटा पटकन मिळतो. त्यामुळे सार्वजनिक वायफाय मुळे तुमचा डाटा हा गोपनीय न राहता तो सुद्धा सार्वजनिक होऊन जातो. ज्यामुळे सायबर चोरांना त्याचा खूप मोठा फायदा होतो.
या सार्वजनिक वायफाय मुळे तुमची बँक माहिती, पासवर्ड आणि इतर काही महत्त्वाची माहिती सहजपणे चोरीला जाऊ शकते. ज्याच्यामुळे तुम्ही सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकता. त्यामुळे ही तिसरी महत्त्वाची टीप की सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर तिथे असणाऱ्या सार्वजनिक वायफाय चा वापर टाळा.
4. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका (Don’t click on unknown links)

डिजिटल पेमेंट करत असताना चौथी महत्त्वाची सुरक्षिततेची टीप ती म्हणजे अशी की आपल्याला आपल्या ईमेलवर किंवा एसएमएस वर किंवा सोशल मीडियावर अशा वेगवेगळ्या अनोळखी आणि संशयास्पद लिंक येत असतात. यावेळी आपण एक काळजी घेणे गरजेचे आहे की अशा लिंक वर आपण क्लिक करायचे नाही कारण त्या लिंक ला जर आपण क्लिक केले तर त्या मार्फत फिशिंग, मिसिंग आणि मालवेअर हल्ला होऊ शकतो.
कारण अशा लिंक म्हणजे या चुकीच्या गोष्टींसाठी प्रवेशद्वार आहे. यामुळे तुमची माहिती चोरली जाऊ शकते किंवा तुमच्या डिवाइस मध्ये व्हायरस येऊ शकतो आणि त्याद्वारे सर्व सायबर अटॅक होऊ शकतात. विशेष म्हणजे अशावेळी सायबर गुन्हेगार हे आकर्षक ऑफर किंवा काहीतरी भीती दाखवून तुम्हाला त्या लिंक वर क्लिक करण्यासाठी प्रवृत्त करतात. ज्यामुळे आपण त्याला बळी पडतो आणि त्याच्या वरती क्लिक करून आपण सायबर गुन्ह्याचे शिकार होतो. त्यामुळे अशा लिंक वर क्लिक न करणे ही सर्वात मोठी सुरक्षिततेची टीप आणि कृती आहे.
5. तुमची गोपनीय माहिती शेअर करू नका (Don’t share your confidential information)

डिजिटल पेमेंट म्हणजे काय हे विचारात घेत असताना आपण हे डिजिटल पेमेंट करताना आपली गोपनीय माहिती म्हणजेच महत्त्वाची माहिती जसे की आपल्या एटीएम कार्डचा पिन डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा नंबर त्याचा CVV किंवा ओटीपी किंवा पासवर्ड किंवा इतर वैयक्तिक आणि आर्थिक माहिती कोणासोबतही शेअर करू नका.
खरे तर यासाठी बँक कधीच आपल्याला कॉल करत नाही त्यामुळे काही सायबर गुन्हेगार असा फ्रॉड कॉल आपल्याला करून असं भासवतात की ते एक बँक कर्मचारी आहे किंवा प्रतिनिधी आहे किंवा सरकारी अधिकारी असल्याचा दावा आपल्याला करून देतात आणि आपल्याकडून आपली ही गोपनीय माहिती काढून घेतात त्यामुळे आपण हा विचार करणं गरजेचं आहे की अशा प्रकारची माहिती आपण शक्यतो फोनवर देणे टाळावे.
कारण ही माहिती जर सायबर गुन्हेगारांना मिळाली तर आपल्या खात्यातून आपले सगळे पैसे चोरीला जाऊ शकतात त्यामुळे डिजिटल पेमेंट करत असताना हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आपण विचारात घेतला पाहिजे. असे काही कॉल आपल्याला आल्यावर आपण तो कॉल त्वरित बंद करावा.
6. ॲप्स आणि सॉफ्टवेअर नियमित प्रमाणे अपडेट ठेवा (Keep apps and software updated regularly)

डिजिटल पेमेंट करण्यासाठी आपल्याला जे वेगवेगळे डिजिटल ॲप्स किंवा ऑपरेटिंग सिस्टीम किंवा जे वेगवेगळे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहेत. हे नेहमी अपडेट करणे गरजेचे आहे कारण कंपनीकडून ह्या अपडेट्स आपल्या सुरक्षिततेसाठीच आलेले असतात. ज्यामुळे आपण धोक्यांपासून वाचू शकतो आणि सायबर हल्ले यामुळे टाळता येतात. त्यामुळे काही काळानंतर आपण हे सर्व ॲप्स किंवा सॉफ्टवेअर हे नियमित अपडेट ठेवणे गरजेचे आहे.
7. व्यवहाराची सत्यता पडताळून बघा (Verify the authenticity of transactions)

एक लक्षात घ्या की, कोणत्याही पेमेंट लिंक वर किंवा QR Code वर किंवा ॲपद्वारे पेमेंट करताना आपण त्या संबंधित कंपनीची त्या व्यवहाराची सत्यता म्हणजेच ते खरे आहे की खोटे आहे याची खात्री करणे गरजेचे आहे. यासाठी आपण त्यासंबंधीतले ऑनलाईन रिव्ह्यू तपासावे किंवा त्या कंपनीच्या वेबसाईटला जाऊन वेबसाईट ची माहिती चेक करावी.
जर तुम्हाला त्या कंपनीबाबतची माहिती वेबसाईटवर मिळाली नाही तर समजून जावे की यामध्ये काहीतरी गडबड आहे किंवा क्यूआर कोड स्कॅन करताना तो त्या योग्य व्यक्तीचा योग्य दुकानदाराचा आहे की नाही याची खात्री करावी. कारण बऱ्याच वेळा बनावट किंवा कोड हा वापरला जातो. जर एखादा व्यक्ती तुम्हाला पेमेंट करण्यासाठी घाई करत असेल जसे की मर्यादित वेळेची ऑफर किंवा तात्काळ कार्यवाही आवश्यक अशा काही ऑफर्स ला बळी पडून आपण पेमेंट करण्यासाठी घाई करतो.
पण ही गोष्ट विचारात घेणं गरजेचं आहे की एखादा व्यक्ती तुम्हाला पेमेंट करण्यासाठी घाई करत असेल तर तो 100% आपली फसवणूक करतोय हे जाणून घ्यावे. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट म्हणजेच डिजिटल पेमेंट करताना आपण त्या व्यवहाराची सत्यता पडताळून बघणं गरजेचं आहे.
8. स्क्रीन लॉक किंवा ॲप लॉक वापरा (Use a screen lock or app lock)

म्हणजेच मोबाईल उघडण्यासाठी आपल्याला आपल्या स्मार्टफोन मध्ये आणि डिजिटल पेमेंट ॲप साठी स्क्रीन लॉक म्हणजे पिन, पॅटर्न, फिंगर प्रिंट किंवा चेहरा ओळख अशा प्रकारचे सुरक्षित स्क्रीन लॉक वापरा. आणि ॲप लॉक चालू ठेवा. म्हणजेच यथा कदाचित तुमचा फोन जर हरवला आणि चुकीच्या व्यक्तीच्या हातात तुमचा फोन गेला तर त्याला तुमचा फोन किंवा डिजिटल पेमेंटचे ॲप ओपन करता येणार नाही, ज्यामुळे तुम्ही तुमचे पैसे हे सुरक्षित ठेवू शकता. त्यामुळे डिजिटल पेमेंट करत असताना तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसाठी स्क्रीन लॉक आणि ॲप लॉक हे नेहमी वापरा.
9. विश्वसनीय ॲप चाच वापर करा (Use only trusted apps)

म्हणजेच डिजिटल पेमेंट करण्यासाठी आपण जे ॲप वापरणार आहे ते ॲप आपण प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वरूनच अशा विश्वसनीय ठिकाणातूनच इन्स्टॉल करावे त्याची पडताळणी करावी आणि त्याचा वापर करावा. एकापेक्षा जास्त पेमेंट एप्लीकेशन चा वापर जर आपण करत असाल तर तो टाळावा कारण जास्त पेमेंट ॲपचा वापर केल्यानंतर आपल्या सुरक्षिततेची सुद्धा गुंतागुंत होऊ शकते तसेच ॲप वापरण्यापूर्वी त्या ॲपचे नियम किंवा अटी शर्ती या काळजीपूर्वक वाचा.
10. सायबर फसवणुकीबाबत तक्रार (Report cyber fraud)

जर तुम्ही चुकून सायबर फसवणुकीला बळी पडला असाल, तर अशावेळी तुम्ही लवकर त्वरित तात्काळ तक्रार करणे गरजेचे आहे, की ज्यामुळे तुमच्या आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते आणि फसवणूक करणाऱ्या लोकांना पकडण्यास मदत होऊ शकते.
हि तात्काळ तक्रार नोंदविण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत जी पुढील प्रमाणे आहेत:-
- फसवणूक झाल्यापासून तीन दिवसांच्या आत तक्रार करणे गरजेचे आहे
- राष्ट्र हेल्पलाइन क्रमांक 1930 वर आपण संपर्क साधू शकतो
- या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाइन तक्रार नोंदवावी ही तक्रार नोंदवल्यानंतर आपल्याला एक एसएमएस येईल आणि त्यामध्ये एक रेफरन्स क्रमांक असेल त्याद्वारे आपण आपल्या तपासाची स्थिती सुद्धा तपासू शकतो.
- एवढे करून सुद्धा जर तुमचा निकाल किंवा तक्रार एक महिन्यात निकाली काढली नसेल तर तुम्ही रिझर्व बँक एकात्मिक लोकपाल योजना अंतर्गत तक्रार नोंदवू शकता.
निष्कर्ष :- डिजिटल पेमेंट म्हणजे काय
अशा प्रकारे डिजिटल पेमेंट म्हणजे काय हे जाणून घेताना आपल्याला याबाबद्दल महत्वाच्या दहा सुरक्षित टिप्स आपण पहिल्या. आम्ही आशा करतो कि हा लेख तुम्हाला महत्वाचा ठरेल. वरील दहा टिप्स चा विचार करता ह्या टिप्स आपण खरच अवलंबल्या पाहिजेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
1. डिजिटल पेमेंट सिस्टम म्हणजे काय?
उत्तर:
डिजिटल पेमेंट सिस्टम म्हणजे अशी पद्धत ज्यामध्ये पैसे देणे किंवा घेणे पूर्णपणे ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केले जाते. यात रोख पैशाऐवजी इंटरनेट, मोबाइल अॅप्स, कार्ड, UPI, नेट बँकिंग अशा डिजिटल साधनांचा वापर केला जातो.
2. डिजिटल पेमेंट म्हणजे काय?
उत्तर:
डिजिटल पेमेंट म्हणजे रोख रक्कम न वापरता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून व्यवहार करणे. उदाहरणार्थ, Google Pay, PhonePe, Paytm, BHIM UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे केलेले व्यवहार हे डिजिटल पेमेंट म्हणून ओळखले जातात.
3. डिजिटल व्यवहार म्हणजे काय?
उत्तर:
डिजिटल व्यवहार म्हणजे पैशाची देवाणघेवाण डिजिटल पद्धतीने होणे. यात विक्रेता आणि खरेदीदार यांच्यातील पेमेंट बँक, वॉलेट किंवा पेमेंट गेटवेच्या माध्यमातून सुरक्षित पद्धतीने पूर्ण होते.
4. डिजिटल पेमेंट कसे काम करते?
उत्तर:
डिजिटल पेमेंटमध्ये व्यवहाराची माहिती पेमेंट गेटवे किंवा बँकेच्या सर्व्हरद्वारे एन्क्रिप्ट करून पाठवली जाते.
वापरकर्ता पेमेंट मोड निवडतो (UPI, कार्ड, नेट बँकिंग).
व्यवहाराची माहिती सुरक्षित चॅनेलने पाठवली जाते.
बँक पेमेंटची पुष्टी करून व्यवहार पूर्ण करते.
5. डिजिटल पेमेंट कसे करावे?
उत्तर:
डिजिटल पेमेंट करण्यासाठी:
मोबाइलमध्ये पेमेंट अॅप (Google Pay, PhonePe, Paytm) डाउनलोड करा.
बँक खाते लिंक करा.
UPI PIN सेट करा.
QR कोड स्कॅन करून किंवा UPI आयडी टाकून पेमेंट करा.
6. डिजिटल पेमेंटचे तीन फायदे कोणते आहेत?
उत्तर:
सुविधाजनक – कधीही, कुठेही पेमेंट करता येते.
सुरक्षित – पासवर्ड, UPI PIN आणि एन्क्रिप्शनमुळे धोका कमी.
वेगवान – काही सेकंदांत व्यवहार पूर्ण होतो.